भाजपची राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी रणनीती ; संभाजीराजेंना पाठिंबा देण्याबाबत भूमिका अस्पष्ट

0
2

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठीच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे अपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहेत. याकरिता आपल्याला सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यावा यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. मात्र अद्याप कोणत्याच राजकीय पक्षाने आपला पाठिंबा त्यांना जाहीर केलेला नाही. या निवडणुकीत भाजपच्या  दोन जागा निश्चितच निवडून येणार आहेत. तर तिसऱ्या जागेसाठी पक्षाने रणनीती आखली आहे.

या निवडणुकीत जिंकण्यासाठी प्रथम क्रमांकाच्या पसंतीचा कोटा हा 42 ठरविण्यात आला आहे. त्यामुळे भाजप दोन जागेवर विजय मिळवेल. तिसऱ्या जागेसाठी भाजपला 13 मते कमी पडत असल्याने भाजपाकडून रणनीती आखण्यात येत आहे. राज्यसभेसाठी पियूष गोयल,  विनोद तावडे,  हर्षवर्धन पाटील,  धनंजय महाडिकयांच्या नावाची चर्चा सध्या चर्चा सुरू आहे.

 

भाजपकडे एकूण ११३ आमदारांचे संख्याबळ आहे. यात भाजपचे १०६ आमदार, रासप १, जनसुराज्य १ आणि अपक्ष ५ आमदार अशा एकूण ११३ आमदार भाजपकडे आहेत. त्यामुळे पक्षाला तिसऱ्या जागेसाठी १३ मतांची गरज आहे. महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आणि भाजपकडे ११३ आमदार आहेत. संख्याबळानुसार भाजप दोन, शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार राज्यसभेवर निश्चितच निवडून येऊ शकतो.

पीयूष गोयल हे केंद्रीय मंत्री असल्याने त्यांची खासदारकी निश्चित मानण्यात येत आहे. विकास महात्मे हे दुसरे खासदार निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागेवर विनोद तावडे, विजया रहाटकर या नावांची भाजपच्या गोटात चर्चा सुरु आहे. तिसऱ्या जागेसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील किंवा माजी खासदार धनंजय महाडिक यांना संधी मिळू शकते, असेहो बोलल्या जात आहे. मात्र असे असले तरी माजी खासदार संभाजीराजे यांना पाठिंबा द्यायचा की नाही, याबाबत भाजपमध्ये विचारविनिमय सुरु असल्याची माहिती आहे. कारण संभाजीराजे भाजपच्या पाठिंब्यावर अवलंबून असून भाजपकडे स्वतःची 22 मते शिल्लक आहेत. अपक्ष व इतर मते मिळून या आकड्यात भर पडू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here