नवी दिल्ली : वृत्तसंस्था: रशिया-युक्रेन संकट अधिक गडद झाल्यामुळे जागतिक बाजारपेठेतील वातावरण खराब झाले आहे. आशिया, युरोपपासून रशियापर्यंतच्या बाजारपेठांमध्ये मोठी घसरण दिसून आली. सिंगापूर एक्सचेंज लिमिटेडमध्ये निफ्टी 175 अंकांनी घसरला आहे. तर डाऊ फ्युचर्स सुद्धा 500 अंकांच्या आसपास खाली आहे. दरम्यान, युक्रेन-रशिया यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय बाजार मोठ्या घसरणीसह उघडला. सध्या, निफ्टी 234.10 अंकासह 16,972.55 च्या पातळीच्या आसपास दिसत आहे. त्याच वेळी, सेन्सेक्स 1001.61 टक्क्यांनी घसरून 56,681.98 च्या पातळीवर आहे.
रशियाने दोन फुटीरतावादी प्रांतांना मान्यता दिली आहे. त्याचवेळी रशियाकडून युक्रेनवर हल्ला होण्याची शक्यता अमेरिकेने व्यक्त केली आहे. या कीय तणावामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरण झाली आहे. भारतीय शेअर बाजारात निफ्टीवरील आयटी निर्देशांक दोन टक्क्यांनी घसरला आहे, तर बँक आणि वित्तीय निर्देशांक 1 ते 1.5 टक्क्यांनी घसरला आहे. ऑटो, फार्मा आणि एफएमसीजी निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिक घसरूण खाली आले आहेत. सध्या सेन्सेक्समध्ये 1016 अंकांची घसरण असून तो 56,666.89 च्या पातळीवर आहे. तर निफ्टी 287 अंकांची घसरण करून 16920 च्या पातळीवर आहे. दरम्यान, बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 5 लाख कोटींहून अधिक खाली आले आहे.
बाजार उघडल्यानंतर सुमारे 254 शेअर्स वधारले, 1932 शेअर्स घसरले आणि 48 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.. दरम्यान, सेन्सेक्समधील सर्व 30 शेअर्स लाल चिन्हावर व्यवहार करत आहेत.
कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ
शेअर बाजारातील घसरण सुरू असतानाच दुसरीकडे मंगळवारी ब्रेंट क्रूडच्या किमतीने आठ वर्षांचा उच्चांक गाठला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 96 डॉलरच्या वर गेली आहे.