बबनबाई जवरीलाल हिरण शाळेत 12 वी च्या परीक्षेला सुरुवात

0
2

कजगाव ता.भडगावः प्रतिनिधी 

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना मुळे बंद असलेल्या 12 वी च्या परिक्षेला 4 तारखेपासून सुरुवात झाली राज्य सरकारने शाळा तेथे केंद्र असा निर्णय घेतला त्या अनुषंगाने कजगाव येथील ब ज हिरण माध्यमिक शाळेत दि 4 पासून 12 वी च्या परीक्षेला सुरुवात झाली.
प्रथमच शाळेत परीक्षा केंद्र सुरू झाल्याने प्रत्येकाला वेगळीच उत्सुकता लागून होती परीक्षा केंद्रा वर एकूण 46 विद्यार्थी पैकी 45 हजर होते गेल्या दोन वर्षांपासून परीक्षा बंद असल्याने विद्यार्थी च्या मनात भीती पाहावयास मिळत होती दोन वर्षांपासून लिखाणाची सवय कमी झाल्याने पेपर लिहिण्यास वेळ पुरणार नसल्याने 30मिनिट वाढवुन देण्यात आले आहे परीक्षा केंद्रांवर कोरोनाचे नियम पाळण्यात आले जसे की सॅनिटायझर करणे तापमान चेक करणे इत्यादी नियम पाळण्यात आले परीक्षा कॉपी मुक्त करण्यासाठी व शांततेत पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षककेतर कर्मचारी प्रयत्न करताना दिसले पोलिस बंदोबस्त परीक्षा केंद्रांवर देण्यात आलेला होतं मुख्यध्यापक हे मुलांचे मनोधैर्य वाढविण्याचे व मनात असलेली भीती दूर करण्यासाठी मार्गदर्शन करताना दिसत होते उपकेंद्र संचालक म्हणून जी टी पाटील यांनी काम पाहिले व बिल्डिंग कंडक्टर म्हणून बी एस पाटील यांनी कामकाज पाहिले परीक्षा केंद्रावर रनर वाल्मिक पाटील यांची नियुक्ती करण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here