जळगाव : प्रतिनिधी
इंडियन रेडक्रॉस सोसायटी आणि वर्धमान जैन को-ऑपरेटीव क्रेडीट सोसायटी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने प्लाझ्मादानाच्या जनजागृती बाबतचे माहितीपर होर्डिंग जळगाव शहरात लावण्यात आले. या होर्डिंगचे उद्घाटन पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी वर्धमान जैन को-ऑपरेटीव क्रेडीट सोसायटी लिमिटेडचे मॅनॅजिंग डायरेक्ट विनोद बोथरा, रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियाणी, रक्तकेंद्र चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, कार्यकारिणी सदस्य सुभाष सांखला, डॉ. अपर्णा मकासरे, पुष्पाताई भंडारी, संदीप काबरा, उज्वला वर्मा आदि उपस्थित होते.
प्लाझ्मादान हे सद्य परिस्थितीत मध्यम स्वरूपाच्या कोरोन बाधित रुग्णांवर उपचाराकरिता फार उपयुक्त ठरत आहे असे डॉक्टरांचे मत आहे. यासाठी कोरोनातून बर्या झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मादान केल्यास अनेक कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणे शक्य होईल आणि प्लाझ्माचा रुग्णाच्या शरीरावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही अशी सर्व प्लाझ्मादानाची माहिती नागरिकांना व्हावी या उद्देश्याने हे होर्डिंग लावण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी रेडक्रॉस व वर्धमान सोसायटी च्या सेवा उपक्रमाचे कौतुक केले.
जळगाव शहराच्या प्रमुख चौकात म्हणजेच आकाशवाणी चौक, गोविंदा रिक्षा स्टॉप,नेहरू चौक, डी मार्ट चौक, अजंठा चौक,एम.जे.कॉलेज चौक, स्वातंत्र्य चौक, शिवाजी चौक, काव्यरत्नावली चौक,गणेश कॉलनी, पांडे चौक,गिरणा टाकी चौक,सिंधी कॉलनी, मानराज पार्क अशा प्रमुख चौकांमध्ये हे होर्डिंग लावण्यात आले आहेत.