चोपडा, प्रतिनिधी । येथील युवा नेतृत्व प्रा.दिव्यांक सावंत यांची अखिल भारतीय मराठा महासंघ महाराष्ट्र राज्याच्या “युवक प्रदेश उपाध्यक्ष” पदी नियुक्ती करण्यात आली.
त्या आशयाचे नियुक्ती पत्र त्यांना पुणे येथील मराठा महासंघाच्या केंद्रीय कार्यालयाकडून प्राप्त झाले.नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष मा.राजेंद्रजी कोंढरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आली.या आधी प्रा.दिव्यांक सावंत यांनी यापूर्वी चोपडा शहराध्यक्ष पदापासून ते जळगांव जिल्हा संपर्कप्रमुख पदी कार्य केले आहे.त्यानंतर त्यांच्या कार्याच्या जोरावर व कामाशी असलेल्या एकनिष्ठते मुळे त्यांना हे नियुक्ती पत्र देण्यात आले.संटनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळात विविध सामाजिक उपक्रम व तसेच संघटना वाढीस सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे दिव्यांक सावंत यांनी कळविले.या नियुक्ती मुळे प्रा.दिव्यांक सावंत यांच्यावर समाजातील सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.