प्रत्येक घटकला सामावून घेणारा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
1

मुंबई : प्रतिनिधी ( यास्मीन शेख )
महाविकास आघाडी सरकारने आज तिसरा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प राज्याला एक पाऊल पुढे नेणारा आहे. समाजितल प्रत्येक घटकला यात सामावून घेण्याचा यात प्रयत्न करण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगीतले. विधीमंडळाच्या सभागृहात अर्थसंकल्प सादर केल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते .
यावेळी अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संगितले की भूविकास बैंकेच्या 985 कर्जदार शेकर्‍यांचा 7/12 सरकार ने कोरा केला असून भूविकास बँकेच्या जमिनी इमारती सरकार ने ताब्यात घेतल्या आहेत . शेततळ्याना 50 हजार ऐवजी75 हजार रुपये अनुदान सरकार देणार आहे . ग्रामसडक योजनेच्या मर्यादेत वाढ केल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले , इनोव्हेशन हब, सुरुकरणार असून खाजगी संस्थांना देखील यात सामावून घेण्याची योजना सरकारने आखल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले.
2020 – 21 मध्ये 50 हजार कोटींची कर्ज काढावे लागले याचे कारण म्हणजे कोरोना बरोबर नैसर्गिक आपत्ती मुळे राज्यावर कर्ज वाढल्याचे त्यांनी कबुल केले.
कोरोना काळात केंद्र सरकार ही अडचणीत असल्याने राज्य सरकारला त्याचा ही फटका बसला असून त्यामुळे कर्ज काढण्याशिवाय पर्याय सरकार नव्हता असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले . राज्य सरकार ने गॅस , सीएनजी मध्ये सरकार कडून लावण्यात आलेल्या कर कमी केला असून त्यामुळे महिलावर्गाबरोबर गाडी चालक छोटे हॉटेल व्यवसायिक याना दिलासा मिळणार आहे . जीएसटी थकबाकी वसुली साठी सरकारनेजीएसटी अभय त्रिसूत्री योजना सूरू केली असून त्यामुळे 2लाख 30 हजार प्रकरणांना फायदा मिळणार आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here