जळगाव, प्रतिनिधी । विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेने चालविलेल्या प्रगती विद्या मंदिर व प्रगती माध्यमिक शाळेत राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला. शासनाच्या आदेशानुसार दिनांक २०, २१, २२ डिसेंबर गणित उत्सव साजरा करण्यात आला.
त्या अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांच्या रांगोळी, परिपाठ, गणितीय पोस्टर गणितीय प्रतिकृती, गणितीय खेळ, प्रश्नमंजुषा असे वेगवेगळे उपक्रम घेण्यात आले इयत्ता पाचवी ते दहावीच्या 130 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने उपक्रम राबविण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त प्रेमचंदजी ओसवाल संस्थेचे अध्यक्ष मंगला दूनाखे,संस्था सचिव सचिन दूनाखे यांनी कार्यक्रमास उपस्थित दिली. सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करून कुणाल पाटील व रामेश्वर नाईक या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरव केला. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा फेगडे,मनीषा पाटील,ज्योती कुलकर्णी सर्व शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन शिक्षक भाग्यश्री तळेले,अलका करणकर व मनोज भालेराव यांनी केले. सूत्रसंचालन वैष्णवी पाटील या विद्यार्थिनीने तर आभार शिक्षक सुवर्णा पाटील यांनी केले.