पाळधी येथील महामार्गावर गतिरोधक बसवा

0
3

जामनेर ः प्रतिनिधी
रोजच होत असणारे छोटे-मोठे अपघात रोखण्यासाठी वेगाने येणाऱ्या वाहनांची गती कमी व्हावी यासाठी पाळधी येथील नाचणखेडा चौफुली आणि जुणे बसस्थानक परिसरात गतिरोधक किंवा पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेना-युवासेना जामनेर तालुक्याच्या वतीने अपर जिल्हा अधिकारी प्रविण महाजन यांना देण्यात आले.
जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील पाळधी (ता.जामनेर) येथील नाचणखेडा चौफुली या ठिकाणी नवीन महामार्ग झाल्यापासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याच ठिकाणावरुन शाळेचे विद्यार्थी आणि शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचा वावर असतो. वेगात येणाऱ्या वाहनांमुळे महामार्ग पार करताना मोठी कसरत करावी लागते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी खुद्द शिक्षक महामार्गावर उभे राहुन विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना सहकार्य करतात. हा धोका लक्षात घेता आणि रोजच होत असणारे छोटे-मोठे अपघात रोखण्यासाठी वेगाने येणाऱ्या वाहनांची गती कमी व्हावी यासाठी पाळधी येथील नाचणखेडा चौफुली आणि जुणे बसस्थानक परिसरात
गतिरोधक किंवा पर्यायी व्यवस्था करण्यात यावी. अन्यथा 15-20 दिवसांनंतर ग्रामस्थांतर्फे आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा शिवसेना-युवासेना जामनेर तालुक्याच्या वतीने अपर जिल्हा अधिकारी प्रविण महाजन यांना देण्यात आलेल्या निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.
याप्रसंगी युवासेना उपजिल्हा प्रमुख विश्‍वजितराजे पाटील, शिवसेना वैद्यकीय कक्ष तालुका समन्वयक ईश्‍वर चोरडिया, युवा तालुका प्रसिध्दी प्रमुख मुकेश जाधव, ग्रा.पं.सदस्य आसिफ पठाण, राष्ट्रवादी पदवीधर सेलचे प्रदेश चिटणीस संदीप पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here