पाचवी ते नववीच्या वार्षिक परीक्षा ऑफलाईन होणार ?

0
2

मुंबई : प्रतिनिधी:  1 मार्चपासून शाळा पूर्ण वेळ सुरू होण्याची शक्यता आहे. कोरोना रूग्णसंख्या कमी होऊ लागल्यामुळे शाळा पूर्णवेळ आणि पूर्ण क्षमतेने सुरू करा, अशी मागणी पालकांकडून होत आहे. याबाबत आता प्रशासनाने चाचपणी सुरू केली आहे.दरम्यान पाचवी ते नववीच्या वार्षिक परीक्षा ऑफलाईन होण्याची दाट शक्यता आहे.त्यादृष्टीने पडताळणी करण्यात येत आहे.
शाळांसोबत आढावा बैठक घेण्यास सुरूवात केली आहे. शाळांकडून आलेल्या प्रतिसादानंतरच हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. निर्बंध कमी झाल्यावर हॉटेल, सिनेमागृह खुली झाली आहेत. मात्र शाळांमध्ये उपस्थिती अजूनही ऐच्छिक आहे. तसेच विद्यार्थी संख्येवरही मर्यादा आहे.
आता शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण अधिकारी, शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाकडून अभिप्राय मागवत आहेत. पाचवी ते नववीच्या वार्षिक परीक्षा ऑफलाईन घेता येतील का, याबाबत काही शाळांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे विचारणा केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here