पहुर मध्ये बैलगाडा शर्यत उत्साहात साजरी

0
30

पहुर ता.जामनेर : प्रतिनीधी
जय श्रीराम मंडळाने आयोजित केलेल्या भव्य जंगी शंकर पट बैलगाडा शर्यत मोठ्या उत्साहाने पार पडली. पहुर मध्ये खुप दिवसानंतर बैलगाडा शर्यतीचे नियोजन करण्यात आले.
या बैलगाडा शर्यतील जळगाव जिल्हा आणि औरंगाबाद जिल्ह्यातील बैलगाड्याचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. या शर्यतीत सहभाग घेण्यासाठी ७०० रूपयांची पावती घेऊन सहभाग घ्यावा लागत होता.
शर्यतीत डॉ.सागर गरूड यांच्या वतीने पहिले ११ हजार, दुसरे प्रदिप लोठा यांच्या वतीने ७ हजार आणि तिसरे स्नेहदिप गरूड ५ हजार असे तिन प्रकारचे बक्षीस ठेवण्यात आले होते. बैलगाडा शर्यतीसाठी एकूण ६० बैलजोड्यांचा समावेश होता.
शर्यतीचे अंतर २५० फुट असुन पहिल्या नंबर चे बक्षीस घेणाऱ्या तळेगाव च्या बैलजोडीने ६ सेकंद २१ पॉईंट इतक्या कमी वेळात बैलगाडा पोहचावून ११ हजार रूपये च बक्षीस मिळवले, दुसऱ्या क्रमांकावर मानेगाव येथील बैलगाडा ६ सेकंद २४ पॉईंड इतक्या वेळात अंतर गाठून ७ हजार रूपये चे बक्षिस घेतले तर तिसऱ्या क्रमांकाच्या बक्षीस साठी खादगाव येथील बैलगाडा ६ सेकंद ३१ पॉईंड ने पोहोचून ५ हजार रूपये च बक्षीस पटकावले.
या बैलगाडा शर्यतीत प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरुड, रा.कॉ.जळगाव जिल्हा डॉक्टर सेल अध्यक्ष डॉ.सागर गरुड, माजी जि.प. कृषी सभापती प्रदिप लोढा, रा.कॉ चे युवा नेते स्नेहदीप गरुड, उपसरपंच शाम सावळे, विकासो चेअरमन अशोक घोंगडे, डॉ.जितेंद्र घोंगडे, उपसरपंच,विवेक जाधव,बापू बनकर, शिवाजी राऊत, बालू सुरडकर, तंटामुक्ती अध्यक्ष योगेश बनकर, ईश्वर बनकर, ईश्र्वर बनकर, दीपक लोढा, आशिष माळी उपस्थित होते.
बैलगाडा शर्यत यशस्वीरित्या पार पडण्यासाठी श्रीराम मित्र मंडळाचे अध्यक्ष किशोर जाधव, उप अध्यक्ष राम नाथ, सदस्य उद्धव घोंगडे, रितेश पवार, सतिष जाधव, जयंत चौधरी आधी श्रीराम मंडळाच्या कार्यकर्तांनी मेहनत घेऊन कार्यक्रम पार पाडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here