जळगावः प्रतिनिधी
बारावीच्या बोर्डाच्या परिक्षेस आज दि.4 मार्च पासुन सुरूवात झाली. पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला शहरातील परीक्षांकेंद्रांवर कॉप्यांचा सुळसुळा झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
बारवीच्या परिक्षांना सुरूवात झाली असून आज पहिलाचा पेपर इंग्रजीचा होता. इंग्रजी हा विषय कठिण असल्याचा अनेकांचा समज असतो यामुळे मोठ्या प्रमाणावर कॉप्या केल्या जात असल्याचे चित्र पहावयास मिळते. शहरातील अश्याचा काही केंद्रावर कॉपी पुरविणाऱ्यांनी तारेवरची कसरत करीत परिक्षार्थी विद्यार्थ्यांना कॉपी पुरविल्याचे दिसुन आले. मोठ्या प्रमाणावर भरारी पथके तैनात करण्यात आले असले तरी कॉपी पुरविणारे देखिल काही कमी नसल्याचे परीक्षा केंद्रांवर पहावयास मिळाले. अनेक परिक्षा केंद्राच्या बाहेर कॉप्यांचा खच आढळून आला.