पत्रकार सूर्यभान पाटील यांचे निधन

0
7

जळगाव : प्रतिनिधी
येथील ई टीव्ही भारत या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी सूर्यभान भास्कर पाटील (वय ३४) यांचा शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या १६ दिवसांपासून त्यांच्यावर डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान काल दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, भाऊ, वहिनी असा परिवार आहे.
सूर्यभान पाटील यांनी आरंभी झी चोवीस तास , तत्कालीन स्टार माझा या वृत्तवाहिनीचे कॅमेरामन म्हणून काम केले. ते ई टीव्हीचे प्रतिनिधी झाले. धडपडा पत्रकार म्हणून परिचित असलेला हा उमदा पत्रकार गमावल्याचे दु:ख पत्रकार सृष्टीत उमटले आहे. त्याच्या निधनाने प्रसार माध्यमातून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान राज्यशासनाने कोरोना प्रार्दुभावामुळे मृत झालेल्या अत्यावश्यक सेवेतील सेवा देणार्‍यांना विमा कवच देण्याचे घोषित केले होते. त्यानुसार त्यांच्या कुटुबियांना जिल्हा पालकमंत्री व जिल्हाधिकार्‍यांनी आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here