पंतप्रधान मोदींची गुजरातला तातडीची मदत; मग महाराष्ट्राला का नाही

0
12

जळगाव : प्रतिनिधी
तौक्ते चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरून पुढे गुजरातला गेले आहे. जेवढे नुकसान तिकडे झाले, त्यापेक्षाही अधिक महाराष्ट्रात झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातची पाहणी करून त्यांना तातडीने मदतही जाहीर केली आहे. मग महाराष्ट्राला मदत का जाहीर केली नाही असा टीकात्मक प्रश्न माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला आहे. हा महाराष्ट्रावर अन्याय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातप्रमाणे महाराष्ट्राला मदत करणे अपेक्षित आहे. राज्यातील जनतेचे वादळाने नुकसान झाले तर राज्य सरकारने मदत केली पाहिजे, त्या दृष्टीने राज्य सरकार हालचाली करीत असून त्यांची मदत जाहीर होणार आहे; परंतु केंद्र सरकारकडून दुजाभाव होता कामा नये. नुकसान प्रत्येक नागरिकाचे होत असते, त्यांना मदतीचा हात देणे आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले.
सध्या कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे राज्यात रेमडेसिविर इंजेक्शनांचा तुटवडा नाही; परंतु कोरोनातून बर्‍या होणार्‍या रुग्णांना म्युकरमायकोसिस हा आजार होत आहे. त्यासाठी ऍफोटेरेसिन बी या इंजेक्शनची गरज आहे. हे इंजेक्शन उपलब्ध होत नाही, केंद्राने इंजेक्शनचा साठा राज्याला उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खडसे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here