पंतप्रधानांनी बोलवलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उद्धव ठाकरे गैरहजर राहणार

0
2

मुंबई : प्रतिनिधी I पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज करोना परिस्थिचा आढावा घेण्यासाठी देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत बैठक बोलवली असली तरी या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंऐवजी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिलीय मात्र या निर्णयामधील कारणाबद्दल कोणताही खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेला नाही.

आरोग्यमंत्री राहणार उपस्थित
पंतप्रधान मोदी आज दुपारी साडेचारच्या सुमारास सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. राज्यांमधील लसीकरण वाढवण्यासाठी आणखी लससाठी मिळावा आणि इतर औषधांबाबत यावेळी राज्यांकडून मागणी केली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून केंद्र सरकार सुद्धा लसीकरणासंदर्भातील काही निर्देश देणार असल्याची तसेच निर्बंधांबद्दल या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. तसेच या बैठकीमध्ये पुन्हा निर्बंध कठोर करण्याबरोबरच देशभरामध्ये लॉकडाउन लावण्याच्या शक्यतेबद्दलही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या बैठकीमध्ये महाराष्ट्र सरकारच्यावतीने मुख्यमंत्र्यांऐवजी राज्याचे आरोग्यमंत्री सहभागी होणार आहेत.

लॉकडाऊनसंदर्भात निर्णयाची शक्यता
सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या या बैठकीमधील केंद्र सरकारकडून कठोर निर्बंधांबद्दल चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. निर्बंध कठोर करण्यासंदर्भात चर्चा करुन त्याबद्दल महत्वाचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत घेतला जाईल असे म्हटले जात आहे.या बैठकीमध्ये लॉकडाउनसंदर्भात विचार केला जाऊ शकतो अशीही चर्चा आहे मात्र यासंदर्भातील अंतिम निर्णय पंतप्रधानच घेतील असा दावा केला जातोय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here