नेहरु युवा केंद्रातर्फे यावल येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धां संपन्न

0
2

यावल, प्रतिनिधी । भारत सरकारच्या युवा क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्रातर्फे यावल येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात कबड्डी व्हॉलीबॉल आणि धावणे या स्पर्धां स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन जळगाव यांच्या सहकार्याने संपन्न झाल्या.

या स्पर्धेत 15 ते 29 या खूल्या वयोगटातील युवक व युवती खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धा नेहरू युवा केंद्र जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर सर,लेखापाल अजिंक्य गवळी सर, यावल तालुका समन्वयक तेजस पाटील व पल्लवी तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. या स्पर्धांचे उद्घाटन यावल तालुका तहसीलदार महेश पवार साहेब यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून यावल कॉलेज प्राचार्य डॉ संध्या सोनवणे मॅडम, उपप्राचार्य खैरनार सर उपस्थित होते. यावेळी तहसीलदार साहेबांनी मनोगतात खेळाडूंना प्रोत्साहन दिले.

तसेच कोविड काळं पार पडल्यानंतर तालुकास्तरावर सर्व संघ बोलवून मोठी स्पर्धा आयोजित करू असे आश्वासन खेळाडूंना दिले. तसेच स्पर्धेसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्यात. तर प्राचार्य डॉ संध्या सोनवणे मॅडम यांनी खेळाडूंना फिट राहण्याचा सल्ला दिला. त्यासोबत सांघिक भावनेने खेळून आपल्या कॉलेजचे नाव मोठे करण्याचा सल्ला दिला. उपप्राचार्य खैरनार सरांनी मनोगतात खेळाचे महत्त्व सांगितले स्पर्धेत कब्बडीमध्ये मुलांचे 14 संघ व मुलींचे 4 संघ, व्हॉलीबॉलमध्ये मुलांचे 6 संघ व मुलींचे 4 संघ आणि धावण्याच्या स्पर्धेत 134 युवक युवती सहभागी झाले होते.

स्पर्धेकरीता यावल कॉलेज मधील अर्जुन पाटील सर, मिलिंद दादा बोरखेडेकर, संतोष दादा ठाकूर व स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन जळगाव जिल्हा सचिव योगेश चौधरी, कोच योगेश तडवी सर, मुकेश तांबट सर, जितेंद्र पाटील, दीपक खंबायात, दुर्गेश पाटील आदींनी परिश्रम घेतले. विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी मेडल व सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले. जे संघ तालुकास्तरावर जिंकले आहेत त्यांना जिल्हास्तरावर तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. सूत्रसंचालन योगेश चौधरी,
तर प्रास्ताविक व आभार तेजस पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here