नीलकमल हॉस्पिटलतर्फे किडनी सुरक्षा सप्ताहाचे आयोजन

0
7

जळगावः प्रतिनिधी

येथील नीलकमल हॉस्पिटलकडून 8 ते 16 मार्चदरम्यान किडनी सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेतलेले डॉ.मनोज टोके या किडनी सुरक्षा सप्ताहात रुग्णांच्या तपासण्या आणि उपचार करीत आहेत.
या विशेष सप्ताहात रुग्णांसाठी नाममात्र 100 रुपये नोंदणी शुल्क असून शुगर, क्रियाटिन आणि लघवी तपासणी मोफत केली जात आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत रुग्णांची तपासणी केली जात आहे. नीलकमल हॉस्पिटलमध्ये किडनीच्या सर्व आजारांवर उपचार उपलब्ध आहेत.
सकाळी झोपेतून उठल्यावर डोळ्याखाली आणि चेहऱ्यांवर सूज दिसणे, हात आणि पायांना मुंग्या येणे, भूक कमी लागणे, मळमळ होणे, उच्चं रक्तदाब, साखर नियंत्रणात नसणे, लघवी करताना जळजळ होणे, लघवी थेम्ब थेम्ब होणे, लघवीतून रक्त येणे, दम लागणे, शरीरातील रक्त कमी होणे, मुतखडा, गाऊट आणि डायलिसिस बद्दल समस्या असलेल्या रुग्णांसाठी ही संजीवन संधी आहे. पंचमुखी हनुमान मंदिराजवळील नीलकमल हॉस्पिटलशी गरजू रुग्णांनी 0257-2220708 किंवा 9021793958 आणि 7843016243 या क्रमांकांवर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here