जळगाव ः प्रतिनिधी
इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्ट-३०३ द्वारा जळगाव शहरातील निराधार व गरीब मुलीच्या कन्यादान व लग्नांची जवाबदारी नुकतीच पार पडली.
यात क्लबद्वारा दोन निराधार आणि गरीब मुलींच्या लग्नासाठी लग्नात लागणारे सर्व साहित्य म्हणजे नवरदेव, नवरी मुलीसाठी सोन्याच्या अंगठ्या, बांगड्या, सोन्याचांदीचे दागिने, मणी मंगळसूत्र, पायल, बेल, वर-वधूसाठी लग्नाचे कपडे, साडी, त्यात प्रमाणे संसारासाठी लागणारे सर्व साहीत्य म्हणजे भांडे, मिक्सर, कुकर सर्व संसार आणि ७ हजार रुपये रोख क्लबच्या वतीने देण्यात आले. या कार्यक्रमात जिल्हा चेअरमन मीनल लाठी, अध्यक्षा प्रीती दोशी, सेक्रेटरी नीता परमार, श्रीमती स्मिता पाटील, पास्ट प्रेसीडेंट सीमा जाखेटे, वंदना काबरा उपस्थित होत्या.
कोरोना रुग्णांसाठी योगदान
इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्ट-३०३ द्वारा शहरातील इकरा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पीटल मध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांना सॅनिटायझर स्टँड, सॅनिटायझर, मास्क, साबण व फळांची वाटप केले. तसेच हॉस्पीटलच्या मुख्य द्वारावर सॅनिटायझर स्टँड लावण्यात आले.
या उपक्रमास वेडी क्लबच्या अध्यक्ष प्रीती दोशी, सचिव निता परमार, सदस्य शीतल शाह आणि डॉ. सुवर्णा वानखेडे उपस्थित होत्या.त्याचप्रमाणे मायादेवी भाजी मार्केट मध्ये मास्क आणि सॅनिटायझर भाजीपाला व फळ विक्रेत्यांना वाटप करण्यात आले.
मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया
याशिवाय इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्ट-३०३ तर्फे नुकतेच नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. त्यात पाच रुग्णांना मोतीबिंदू आढळून आला. त्यांचा मोतीबिंदूचे शस्त्रक्रिया क्लबद्वारा मोफत करण्यात आल्या. रुग्णांची शस्त्रक्रिया डॉ. तुषार फिरके यांच्याकडे करण्यात आले. सदर शस्त्रक्रियासाठी आर्थिक सहकार्य डॉ.काजल फिरके, प्रीती दोशी, कार्तिकी शहा यांचेकडून देण्यात आले. शस्त्रक्रिया दरम्यान अध्यक्षा प्रीती दोशी, सचिव नीता परमार, डॉ. श्रीमती काजल फिरके उपस्थित होते.