निंभोरा पोलीस हद्दीत अवैध धंद्यांचा उच्चांक!

0
4
जळगावातील दादावाडी येथील जुगार अड्ड्यावर जिल्हापेठ पोलिसांची धाड सविस्तर वाचा ???? https://divyajalgaon.com/?p=17059

रावेर, तालुका प्रतिनिधी । तालुक्यातील निंभोरा पोलीस स्थानकाच्या हद्दीत अवैध धंदे व धंद वाल्यांनी डोके वर काढले असून सर्वसामान्य व गरीब जनतेच्या संसाराची राख रांगोळी होत असतांना, कायदा सुव्यवस्था सांभाळणारे पोलीस मात्र …अर्थ…पूर्ण व्यवहारात मग्न असल्याचे खुलेआम चित्र दिसत असून  त्याबाबत  परिसरात  चर्चा रंगली आहे.उपविभागीय अधिकारी फैजपूर, अप्पर जिल्हाधिकारी जळगाव व जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव यांनी याबाबत कठोर भूमिका घेत अवैध धंद्यांना वाव देणाऱ्या निंभोरा पोलीस उपनिरीक्षकांवर अंकुश ठेवावा अशी मागणी सर्वसामान्यामधून जोर धरत आहे.

निंभोरा पोलीस स्थानकाच्या हद्दीत 29 गावांचा समावेश आहे . त्यात निंभोरा, तांदळवाडी, बलवाडी , शिंगत , विवरे बुद्रुक , विवरे खुर्द,मांगलवाड,खिर्डी   यासम मोठ्या गावांचा समावेश आहे. कायदा -सुव्यवस्था अबाधित राखणाऱ्या निंभोरा पोलिसांकडून अवैध धंद्यांना अधिकृत परवानगी देण्याचे काम खुले आम सुरु आहे. यात त्यांच्या विशिष्ट टीममार्फत दरमहा लाखो रुपयांचा हफ्ता अवैध धंद्यांवाल्यांकडून वसूल केला जात असल्याचे खुलेआम पुरावे समोर येत आहेत. सट्टा, पत्त्यांचे क्लब,अवैध रिक्षा,ट्रक यांची दरमहा हफ्ता वसुली , विमल गुटखा सर्रास विक्रीसाठी दरमहा हफ्ता, अवैध दारूची विक्री अशा अवैध धंद्यांमुळे निंभोरा पोलिसांमार्फत पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन होतांना दिसून येत आहे.

या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीं म्हणजे  उपविभागीय अधिकारी फैजपूर, अप्पर जिल्हाधिकारी जळगाव व जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव यांनी याबाबत कठोर भूमिका घेत अवैध धंद्यांना वाव देणाऱ्या निंभोरा पोलीस उपनिरीक्षकांवर कायदेशीर अंकुश ठेवावा अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here