नऊ बांग्लादेशींना युक्रेनमधून परतले आपल्या मायदेशी शेख हसिनांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार.

0
3

दिल्ली-   रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अजूनही सुरूच आहे. युद्धामुळे वेगवेगळ्या देशातील अनेक नागरिक युक्रेनमध्ये फसले आहते. भारत सरकार ने आपल्या नागरिकांना आपल्या मायदेशी आणण्यासाठी ‘ऑपरेशन गंगा’ राबवत आहे. ‘ऑपरेशन गंगा’ मोहिमेंतर्गत आतापर्यंत हजारो विद्यार्थी तसेच नागरिकांना भारतात परत आणले आहे. भारताने फक्त भारतीय नागरिकांनाच युक्रेनबाहेर न काढता पाकिस्तान, नेपाळ या देशांतीलही नागरिकांची सुटका केली व नऊ बांगलादेशी नागरिकांना नुकतेच युक्रेनमधून बाहेर काढले आहे, या उत्कृष्ट कामगिरी बदल बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

या आधी ही भारताने नेपाळ,पाकिस्तान या देशातील नागरिकांना सहायता केली आहे. नुकताच व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये पाकिस्तानी विद्यार्थिनीनी संघर्षग्रस्त भागातून बाहेर काढ्याबद्दल भारतीय बचाव दलाने मदत केल्याबद्दल भारत सरकारचे व नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे.

ही बातमी पण वाचा : आमदाराच्या शिक्षण संस्थेत परीक्षा केंद्रावर शिक्षण विस्तार अधिकारी “धनके”चा बेकायदा प्रवेश करून दबदबा.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने युक्रेमधील सुमे येथे अडकलेल्या सर्व भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले आहे. या भागात रशियाकडून मोठ्या प्रमाणात हल्ले करत आहे. ऑपरेशन गंगा सुरू केल्यापासून आतापर्यंत १८०० भारतीयांना विशेष विमानाने भारतात आणले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here