मलकापूर ः प्रतिनिधी
जगाच्या पाठीवर वयाच्या 14 व्या वर्षी बुधभूषणम ग्रंथ लिहणाऱ्या व वेगवेगळ्या भाषांच ज्ञान उराशी असलेल्या धर्मवीर संभाजीराजांची किर्ती गगनाएवढी अशीच होती. स्वाभिमानान जगावं कस हे शिवरायांनी तर मराव कस हि शिकवण संभाजी महाराजांनी दिली. युवकांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे असे प्रतिपादन शिवमती वनिता गायकवाड यांनी केले.
विदर्भाच्या प्रवेशद्वारी मलकापूरात धर्मवीर संभाजीराजेंचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने यशवंत नगर, नांदुरा रोड, तहसील चौक, मुक्ताईनगर रस्त्यावरुन टाळ म्रुदंगाच्या गजरात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज नगरात मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.
महावितरण कंपनीच्या कार्यालय परिसरात आयोजित व्याख्यानात शिवमती वनिता गायकवाड यांनी धर्मवीर संभाजीराजेंच्या जिवनावर प्रकाश टाकला.विचार पिठावर माजी आ. वसंत शिंदे, राकाँ जिल्हाउपाध्यक्ष संतोष रायपूरे, आई तुळजा भवानी फाउंडेशनचे अध्यक्ष शिवराज जाधव, राकाँ शहराध्यक्ष अरुण अग्रवाल, तालूकाध्यक्ष बाळाभाऊ पाटील, मराठा सेवा संघाचे मुकेश जगताप, राजाभाऊ डोफे, मराठा युवा नेते शुभम लाहुडकर, हनुमान सेनेचे अमोल टप, शिवाजी नगरमित्रमंडळाचे दुर्गैश राजापूरे, टायगर ग्रुपचे मंगेश कुयटे आदींची उपस्थीती होती.
मलकापूरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मोत्सव आयोजनाबाबत असंख्य शंभूभक्तांच्या मनात असलेली संकल्पना आज शनिवारी प्रत्यक्षात उतरली,या आधी वैचारिक मंथन कार्यक्रमातून अनेकदा हा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. मात्र यावेळी मिरवणुकीच्या माध्यमातून शंभूराजेंचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. समारोपीय सत्रात आई तुळजा भवानी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मानवंदना देण्यात आला. त्यानंतर व्याख्यान पार पडले सूत्रसंचालन नितीन भुजबळ यांनी तर आभार प्रदर्शन चेतन जगताप यांनी केले.
शंभुराजेंच्या जन्मोत्सवाची सुरुवात आ.राजेश एकडे यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर भाजपानेते शिवचंद्र तायडे, बाजार समितीचे मुख्य प्रशासक डॉ. अरविंद क़ोलते, माजी नगराध्यक्ष अँड हरीश रावळ, शिवसेना शहरप्रमुख किशोर नवले, रा.काँ शहराध्यक्ष अरुण अग्रवाल, भाराकाँ तालुकाध्यक्ष बंडूभाऊ चौधरी, शहराध्यक्ष राजू पाटील, जि.प.सदस्य केदार एकडे, माजी नगरसेवक अनिल गांधी, सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव ढगे,संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष योगेश पाटील आदीसह अनेकांनी शंभूराजेंना अभिवादन केले. त्या नंतर आयोजित मिरवणुकीत शंभूभक्तांनी सहभाग घेतला.