धर्मरथ फाउंडेशनतर्फे सामाजिक पुरस्कार प्रदान

0
3

जळगाव : प्रतिनिधी
धर्मरथ फाउंडेशन जळगाव आयोजित जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक, क्रीडा सांस्कृतिक, खेळाडू व सामाजिक पुरस्कार आणि शिवव्याख्यान २०२२ जळगाव जिल्ह्यातील क्रीडा सांस्कृतिक व परंपरेचा वारसा तसेच आपआपल्या क्षेत्रातील जडणघडणी मध्ये प्रचार प्रसार करून अग्रेसर असण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी शिवजयंतीचे औचित्य साधुन पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
या प्रसंगी उपस्थित मान्यवर जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.रंजना पाटील, उपमहापौर कुलभूषण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील , माजी मंत्री जिल्हा बँक चेअरमन गुलाबराव देवकर, प्रशांत तायडे, सुजाता गुलाने यांच्या हस्ते पुरस्कार वाटप करण्यात आले.
यावेळी मेहुनबारे क्रीडाशिक्षक योगेश रामराव साळुंखे, गणेश नारायण पाटील, सुनील शामराव पाटील, भूषण परशुराम रायगडे, संदेश हिरामण महानुभव, विलास निंबा पाटील, महिंद्रा संभाजी पाटील, दिपक कृष्णा चौधरी, अंजली नाईक, सोनाली देविदास सोनवणे, विजय तात्यासाहेब शितोळे, किशोर गजानन नेवे, प्रीती गोपाळ मिस्तरी, गौरी गणेश महाजन, सन्मुख गणेश महाजन, राहुल भागवत सूर्यवंशी, भारती रविंद्र काळे यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उल्हास ठाकरे व आभार प्रदर्शन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनायक पाटील यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष भितांडे, राजेश पाटील, साजीद पठाण, वेदांत नाईक, तन्मय राणे, मयूर देशमुख, सागर कुटुंबळे, रोहित कुटुंबळे आदींनी परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here