दोरी तुटली अन्‌ गळफास सुटला

0
1

जळगाव : प्रतिनिधी
शहरातील शिवाजी नगर परिसरातील एका व्यक्तीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला मात्र कदाचित त्याचा हा जीवघेणा प्रयत्न परमेश्‍नरालाही मान्य नव्हता. या व्यक्तीने काही कारणास्तव गळफास घेऊन मृत्युला कवटळण्याचा निश्‍चय केला मात्र त्याचे हे कवटळाने परमेश्‍वरालाही मंजूर नसावे म्हणून गळफास घेतांना दोरी तुटली व गळफास सुटला व हा प्रयत्न असफल ठरल्याने त्याच्या परिवारातीलल सदस्यांनीही मोकळा श्‍वास घेतला.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील शिवाजी नगर परिसरातील एका 40 ते 45 वर्षीय व्यक्तीने आज दुपारी 12 ते 1 वाजेच्या सुमारास घरात कुणीही नसतांना गळफास घेऊन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला परंतु परमेश्वराला ते मान्य नसल्यामुळे सुदैवाने ती दोरी तुटल्याने त्या व्यक्तीचे प्राण वाचले व परिवारातील सदस्यांनीही गंभीर घटना टळल्याने हुश्‍श करीत सुटकेचा श्‍वास घेतला.या घटनेची परिसरात दिवसभर चर्चा सुरु होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here