जळगाव । शहरातील नूतन मराठा महाविद्यालयाजवळील एका आईस्क्रीम पार्लर दुकानात कामगार व सेल्समन यांच्यात शाब्दिक वाद होऊन एकमेकांना मारहाण झाली. यात दुकानदाराचे नुकसान झाले. याबाबत शहर पोलिसात परस्पर विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
रायसोनीनगरातील उमेश शांतीलाल कुमावत (वय-३७) हे अरुण आईस्क्रीमवर कामाला आहेत. शुक्रवार ७ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता त्यांच्या दुकानावर हँटसन ग्रो कपंनीचा सेल्स ऑफीसर असल्याचे सांगत त्याने लवकर आईस्क्रीमची आर्डर द्या असे म्हणत वाद घातला. दोघांनी एकमेकांला मारहाण करत जिवेठार मारण्याच्या धमकी दिली. या वादात दुकानातील संगणकाचे नुकसान झाले. दोघांनी परस्पर विरुद्ध तक्रार दिल्यावरुन शहर पोलिसात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तपास उपनिरीक्षक सर्जेराव क्षिरसागर करत आहेत.