दिवाळीनिमित्त अभाविप जळगावतर्फे जनजाती पाड्यांवर साडी फराळ भेट

0
27

जळगाव, प्रतिनिधी । दि 13 नोव्हेंबर रोजी स्टुडन्ट फोर सेवा व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव महानगराच्यावतीने परिषद की दिवाळी या उपक्रमांतर्गत आपल्या घराप्रमाणे जनजाति बांधवांचे घरात आनंदाचा दिवा लागावा या उद्देशाने अभाविप जळगावच्या कार्यकर्त्यांनी शहरांमध्ये विविध ठिकाणी फिरून साड्या, फराळ व मिठाई एकत्र करून यावल तालुक्यातील निंबादेवी जवळील जनजाति पाड्यावर साडी चोळीचा आहेर, फराळ व मिठाई वाटप करण्यात आली.

या वेळी छत्रपती शिवाजी महाराज नगर अध्यक्ष डॉ प्रा. अखीलेश शर्मा यांनी जनजाती पाड्यांवर असलेल्या विद्यार्थ्यांना व पालकांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले तसेच वाढत्या व्यसनाधीनतेवर प्रामुख्याने प्रकाश टाकला व व्यसनाधीनते च्या दुष्परिणामांचे चित्र डोळ्यासमोर उभे करून व्यसनापासून दुर राहण्यास सांगितलं, आपण सर्व हिंदू आहोत आपण भगवान बिरसा मुंडा हे आपले वंशज आहे. आपणच आपली हिंदू संस्कृती जोपासावी असे सागितले तसेच आकाश पाटील यांनी भगवान बिरसा मुंडा यांचा पंचवीस वर्षाचा ज्वलंत इतिहास त्यांच्यासमोर प्रेरणा स्वरूपात मांडला. गावातील नागरिक व प्रा.अखीलेश शर्मा तसेच कार्यक्रम प्रमुख सारंग कोळी,नगर मंत्री आकाश पाटील,SFD संयोजक मनीष चव्हाण, SFS संयोजक हिमाली वाडेकर,भावेश भोई आदी कार्यकर्त्यांनी परिषद की दिवाळी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here