दिपक गुप्ता यांच्यावर कारवाई करण्याची आरपीआयची मागणी

0
1

जळगाव : प्रतिनिधी
राज्यपालांनी दिपक गुप्ता यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आरपीआयतर्फे करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते दिपक प्यारेलाल गुप्ता यांच्यावर राज्यभरात असलेल्या गुन्ह्याचा अनुषंगाने त्यांना जिल्हा पोलीस प्रशासनाने पोलीस संरक्षण दिले असून ते काढून त्यांना प्रशासनाने दोन वर्षाकरीता हद्दपार करावे तसेच महानगरपालिका मालकीच्या दोन सदनिका बेकायदेशीर बळकावलेले आहे ते मनपाने ताब्यात घेऊन ज्यांना घरकूल मंजूर झालेले आहे त्याच्यावर देखिल मनपा कायद्यानुसार कारवाई करावी दि,03,फेबु्रवारी 2022 पर्यन्त चोरून वीज वापरली आहे ते दंडासह वसूल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी यामागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गटातर्फे ) पक्ष्याचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली देण्यात येऊन राज्यपाल महोदय यांनी कारवाईचे आश्वासन याप्रसंगी दिले.
यावेळी युवक अध्यक्ष मिलिंद सोनवणे, उपाध्यक्ष प्रताप बनसोडे, अनिल लोंढे, संदिप तायडे, संदिपान पाटील आदीं उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here