दिग्गज फलंदाज पुजारावर इंग्लंडमध्ये बंदी

0
3

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारताचा फलंंदाज चेतेश्वर पुजारावर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने काउंटी चॅम्पियनशिपच्या एका सामन्याची बंदी घातली आहे. ससेक्स काऊंटी क्लबचा कर्णधार पुजारावर त्याचा सहकारी जॅक कार्सन आणि टॉम हेन्स यांच्या खेळाहीन वर्तनामुळे बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय ससेक्स क्लबला १२ गुणांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
भारताचा चेतेश्वर पुजारा सध्या देशी क्रिकेट खेळत आहे आणि ससेक्सचा कर्णधार आहे. पण सहकाऱ्यांच्या कृतीमुळे त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. पुजाराची गणना टीम इंडियाच्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. मात्र, वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला संघातून वगळण्यात आले होते. पुजारा बऱ्याच काळापासून काऊंटी क्रिकेट खेळत आहे आणि काही काळ ससेक्सचे कर्णधारपदही त्याच्याकडे आहे.खेळाडूंच्या वाईट वागणुकीमुळे ससेक्सवर १२ गुणांचा दंड ठोठावण्यात आला असून त्यामुळे कर्णधार पुजारावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here