Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राजकीय»“त्या ‘ईडी’ पेक्षा आमच्या शेतकऱ्याच्या खिशातल्या बिडीची किंमत जास्त”
    राजकीय

    “त्या ‘ईडी’ पेक्षा आमच्या शेतकऱ्याच्या खिशातल्या बिडीची किंमत जास्त”

    SaimatBy SaimatMarch 6, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    उस्मानाबाद : प्रतिनिधी 

    तालुक्यातील आकुबाई पाडूळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांच्या जिल्हा परिषद गटातील विवीध विकासकामांचे लोकार्पण व कार्यकर्ता मेळावा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या मेळाव्यात भाजपावर जोरदार टीका करण्यात आली. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुडे यांनी यावेळी ईडीच्या कारवायांवरून देखील टोला लगावला. “ईडी पेक्षा आमच्या शेतकऱ्याच्या खिशातल्या बिडीची किंमत जास्त आहे.”, असं त्यांनी बोलून दाखवलं.
    धनंजय मुंडे भाषणात म्हणाले, “आगामी काळात ज्या निवडणुका होणार आहेत, आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे. भाजपाचा आणखीही अंगातला माज गेलेला नाही. होत्याचं नव्हतं नव्हत्याचं होतं केलं तरी. भल्या भल्याच्या मागे इनकम टॅक्स काय, सीबीआय काय… ईडी ची तर इज्ज एवढी पण ठेवली नाही … अरे त्या ईडी पेक्षा आमच्या शेतकऱ्याच्या खिशातल्या बिडीची किंमत जास्त आहे. एवढ्यावरही त्यांना वाटतं की आम्ही कुणाला झुकवू शकतो, वाकवू शकतो, पुन्हा या महाराष्ट्रात सत्तेत येऊ शकतो. त्यांची खरी जर जिरवायची असेल, तर येणाऱ्या नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस हा नंबर एकचा पक्ष आहे हे आपण दाखवलं, तर भाजपावाले या महाराष्ट्राच्या मातीत कधीही अशा पद्धतीचा नाद करणार नाहीत. हा विश्वास मला या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त करावा वाटतो.”

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Devendra Fadnavis : लॉकडाऊनची अफवा पसरवणाऱ्यांनो खबरदार; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला कारवाईचा इशारा

    March 27, 2026

    SC Holiday Verdict : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय: धार्मिक सणासाठी सार्वजनिक सुट्टीची मागणी करता येणार नाही

    March 26, 2026

    Narendra Modi On War : पश्चिम आशियातील युद्धावर भारताची संतुलित भूमिका; लोकसभेत पंतप्रधान मोदींचे स्पष्ट विधान

    March 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.