तीन सोसायट्यासाठी २३ उमेदवारी अर्ज दाखल आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

0
3

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी

सोयगाव तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यातील जाहीर झालेल्या पाच सेवासंस्थापैकी गलवाडा, निंभोरा, आणि उप्पलखेडा या तीन सोसायट्या चे २३ उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल झाले असून शुक्रवारी या पाच सेवा संस्था साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत आहे परंतु अद्यापही फरदापुर आणि उमरविहिरे या दोन सोसायट्यांसाठी एकही उमेदवारी अर्ज प्राप्त झालेला नसल्याची माहिती निवडणूक निर्वाचन अधिकारी ज्ञानेश्वर मातेरे यांनी दिली.

सोयगाव तालुक्यात दुसऱ्या टप्प्यासाठी फरदापुर, गलवाडा,निंभोरा,उप्पलखेडा,आणि उमरविहिरे या पाच सेवा संस्था च्या निवडणुका जाहीर झाल्या आहे त्यासाठी शुक्रवारी दि.६ उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असून दि.९ छाननी हाती घेण्यात येणार आहे. दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील पाच सोसायट्या साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छूकांचा निरुत्साह आढळून येत असल्याने या पाचही सोसायट्या बिनविरोध च्या मार्गावर असल्याचे चित्र आहे तालुक्यात राजकारणात महत्वाचा ठसा उमटविणार्या फरदापुर सोसायटी साठी अद्यापही उमेदवारी अर्ज निरांक असून उमरविहिरे सोसायटी साठीही एकही अर्ज प्राप्त झालेला नाही.

बँकेच्या ठरावाची वेळ निघून गेल्याने सोयगाव तालुक्यात सोसायटी निवडणुकांसाठो उत्साह राहिला नसल्याचे चित्र असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात असून केवळ घोसला आणि पळाशी या दोन सोसायट्या साठीच राजकीय चुरस असल्याचे चित्र आहे नुकत्याच झालेल्या जिल्हा बँक संचालकांच्या निवडणुकीमुळे सोयगाव तालुक्यात सोसायट्या निवडणुकीसाठी चुरस मावळली आहे.

चौकट मागील दोन पंचवार्षिक जिल्हा बँक निवडणुकीत उमेदवार देणारी सोसायटी उमरविहिरे सोसायटीची जिल्हा भर ओळख आहे परंतु या पंचवार्षिक निवडणुकीत या सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडी साठी अद्याप एकही उमेदवारी अर्ज प्राप्त झालेला नाही शुक्रवारी अंतिम मुदतीच्या दिवशी उमरविहिरे आणि फरदापुर सोसायट्या चे चित्र स्पष्ट होईल अर्ज स्वीकृती साठी निवडणूक निर्वाचन अधिकारी ज्ञानेश्वर मातेरे,यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप रावणे, अशोक घनघाव,अशोक वाघ आदी कामकाज करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here