वीज पडून तीन गायीचा मृत्यू; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

0
2

लोणार : प्रतिनिधी

लोणार तालुक्यातील तांबोळा येथे दिनांक 19 मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडा मध्ये पावसाने हजेरी लावली होती यावेळीच तांबोळा येथील गावाशेजारी असलेल्या तीन गाईवर अचानक वीज पडून सदर काही जागीच ठार झाल्या होत्या या घटनेची माहिती लोणार पोलीस स्टेशन, पशुवैद्यकीय अधिकारी व तलाठी यांना देण्यात आली संबंधित अधिकारी यांनी आज 20 मे रोजी तांबोळा येथे येऊन घटनेची पाहणी करून मृत झालेल्या गाई चा पंचनामा केला यामध्ये मधुकर राठोड यांच्या दोन गाईचा मृत्यू होऊन अंदाजे 70 हजार रुपयांचे नुकसान झाले तर अशोक राठोड यांच्या एका गाईचा मृत्यू होऊन अंदाजे 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे,
यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ रवींद्र मुसळे, पशु सहाय्यक डॉ मंगेश पवार, डॉ अमोल राठोड ,लोणार पोलीस स्टेशन चे बिट जमादार गजानन सानप, विशाल धोंडगे व तहसील कार्यालयाचे तलाठी नितेश राणे व कोतवाल राम डोईफोडे,पत्रकार उद्धव आटोळे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here