तरुणीवर अत्याचार ; रामानंद पोलिसांनी संशयिताला केली अटक

0
28

जळगाव : प्रतिनिधी
बाहेरगावाहून शिक्षण घेण्यासाठी शहरात असलेल्या २० वर्षीय तरूणीवर लग्नाचे आमिष दाखवत जबरदस्ती अत्याचार केला व पैश्यांची मागणी करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी तरूणाला रामानंद नगर पोलिसांनी अटक केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, यावल तालुक्यातील २० वर्षीय तरूणी ही जळगाव येथे एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ती शहरात भाड्याच्या खोलीत राहते. दरम्यान तिची ओळख विशाल राजेश तडवी याच्याशी झाला. दोघांची ओळख निर्माण झाल्याने दोघे एकमेकांच्या प्रेमात होते. दरम्यान २८ ऑक्टोबर २०१८ पासून तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर वारंवार अत्याचार केला. त्यानंतर तरूणीकडून पैश्यांची मागणी करू लागला. पैसे दिले नाही तर शिवीगाळ करून मारहाण केली. याला कंटाळून तरूणीने थेट रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून संशयित आरोपी विशाल तडवी याच्या विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी विशाल राजेश तडवी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here