डॉ. करीम सालार यांना शिवपुत्र गौरव पुरस्कार प्रदान

0
2

जळगाव ः प्रतिनिधी
शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे बहुउद्देशीय संस्था (नाशिक) तर्फे डॉ. अब्दुल करीम सालार यांना राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना हा पुरस्कार प्राचार्य डॉ. अशोक राणा व वीरमाता नीता आमले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार विकास भदाणे हे होते. माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, श्रीराम पाटील, मारुती जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले. या वेळी महापौर जयश्री महाजन, डॉ. इक्बाल शाह, एजाज मलिक, अब्दुल अजिज सालार, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here