ट्रान्सपोर्ट नगरजवळ महामार्गावर कारने दिली दुचाकीला धडक

0
21
ट्रकचे चाक फुटल्यामुळे रस्त्यावर उभ्या असणार्‍या ट्रकला धडक

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील ट्रान्सपोर्ट नागरजवळ महामार्गावर कारने एका दुचाकी चालकाला धडक दिल्याची घटना घडली. या धडकेत एका महिलेसह दोन जण गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात कार चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आले आहे.

अजिंठा चौकातील ट्रान्सपोर्ट नगरजवळ महामार्गावर कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महिलासह दोन जणांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली. याप्रकरणी सोमवारी २४ जानेवारी रोजी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनाली गणेश लोखंडे (वय ४१, रा. अशोकनगर, अयोध्यानगर जळगाव) त्यांचा मुलगा जयेश व बहिणीचा मुलगा वैभव असे तीघे (एमएच १९ डीजी ५४९३) ने दुचाकीने सोमवारी २४ जानेवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास जात असतांना अजिंठा चौफुलीच्या पुढे असलेल्या ट्रान्सपोर्ट नगरजवळील महामार्गावर भुसावळकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कार (एमएच १५ एचक्यू ०९५७) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तिघे रस्त्याच्या मधोमध फेकले गेले.

यात जयेश आणि वैभव हे दोघांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी सोनाली लोखंडे यांनी सोमवारी २४ जानेवारी रोजी कारचालकाविरूध्द तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विजय पाटील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here