जळगाव, प्रतिनिधी I येथील जैन महिला मंडळाच्या सदस्यांनी बॉलिवूडच्या कलावंतांची वेशभूषा परिधान करत 2022 या नववर्षाचे स्वागत केले. महिला मंडळाच्या सदस्यांनी ज्या प्रमाणे कलाकारांचा वेशभूषा परिधान केला होता, त्या थीम प्रमाणे फिल्मी गाण्यावर डान्स करत नववर्षाचे स्वागत केले.
यात जैन महिला मंडळाच्या 21 महिला सहभागी झाल्या होत्या. नववर्ष स्वागताचा कार्यक्रम सल्लागार कमला अग्रवाल, रत्नाभाभी जैन, शैला मयूर यांच्या मार्गदर्शनात झाला. कार्यक्रमासाठी अध्यक्षा कंचन भंसाली, मनीषा डाकलिया, सेक्रेटरी हेमा गांधी, उज्ज्वला मुथा यांनी सहकार्य केल्याचे प्रेमलता डाकलिया यांनी सांगितले. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी महिला मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. उपक्रमातून चैतन्य संचारले असे स्पर्धकांनी नमूद केले.