जावेद अख्तर यांना राणेंचा एका आठवड्याचा अल्टिमेटम

0
1

 

 

मुंबई – प्रतिनिधी लेखक व ज्येष्ठ कवी जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि तालिबानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन देशभरातील राजकीय वातावरण गरम आहे. यावरुन भाजपा आमदार नितेश राणे यांनी जावेद अख्तर यांना इशारा दिला आहे. जाहीरपणे चर्चा करा किंवा माफी मागा, असे आव्हान राणे यांनी दिले असून त्यासाठी अख्तर यांना आठवड्याचा कालावधी दिला आहे.

अख्तर यांनी आरएसएस, विहिंप आणि बजरंग दलाला समर्थन करणारे देखील तालिबानी विचारसरणीचे असल्याचे वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद सध्या देशभर उमटत आहेत. यावर नितेश राणे यांनी जावेद अख्तर यांना जाहीर पत्र लिहित ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहे.

ट्विटमध्ये राणे म्हणतात, ‘मी तुम्हाला एका आठवड्याचा अल्टिमेटम देत आहे. एक तर तुम्ही सार्वजनिक मंचावर अथवा माध्यमांसमोर येऊन तुमच्या वक्तव्याचे स्पष्टीकरण द्या. आम्ही तुमच्या सर्व द्वेष आणि गैरसमजांना उत्तर देण्यासाठी तयार आहोत. किंवा तुम्ही सगळ्या हिंदुंची बिनशर्त माफी मागू शकता.’

अख्तर यांच्या या वक्तव्याचा सर्वच पक्षांकडून विरोध केला जात आहे. ‘हिंदू राष्ट्र’ संकल्पनेस पाठिंबा देणारे तालिबानी विकृतीचे आहेत, असे कसे म्हणता येईल? असा प्रश्न शिवसेनेनेही केला आहे. अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालिबानशी केलेली तुलना चुकीचे असल्याचे मत शिवसेनेने व्यक्त केले आहे. भाजप आमदार राम कदम यांनीही जावेद अख्तर यांच्या अटकेची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here