जामनेर : प्रतिनिधी
येथील प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय या ठिकाणी महाशिवरात्री च्या पावन पर्वा निमित्त भाविक भक्तांना कडून विश्व शांती साठी प्रतिंज्ञा घेण्यात आली. प्रथम विद्यालयात जामनेर जि. परिषद मराठी शाळेचे केंद्र प्रमूख के एम अंभोरे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यालयाच्या प्रमूख सुषमा दीदी , सूनिता दीदी यांच्यासह परिसरातील भाविक भक्त गण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ब्रम्हा कुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या प्रमूख सुषमा दीदी यांनी महाशिवरात्री निमित्त मार्गदर्शन केले.