जळगाव शहरात लसीचा उच्चांक महापौर जयश्री ताई महाजन यांच्या पाठपुराव्याने 6062 लसीं उपलब्ध

0
4

जळगाव:- प्रतिनिधी    covid 19 पासून बचावासाठी प्रशासनातर्फे लसींचा पाठपुरावा वेळोवेळी केला जात असून जळगाव शहरात दिनांक 8 सप्टेंबर रोजी तब्बल चोवीस हजार लसींचा विक्रम करण्यात आला आहे. महापौर यांच्या पाठपुराव्याने शहरातील नऊ केंद्रांवर लसीकरण उपलब्ध झाले असून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लसीकरण करण्याचे आवाहन महापौरांतर्फे करण्यात आले आहे.
जळगाव शहरात 6062 लसी उपलब्ध झाल्या असून दिनांक 8 रोजी 24 हजार लसींचा विक्रम करण्यात आला आहे. शहरातील नऊ लसीकरण केंद्रांवर नागरिकांनी लसी घेतल्या आहे. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राम लावलानी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीमने 9 लसीकरण केंद्रांवर सेवा बजावली. शहरातील काशीबाई उखाजी केंद्रावर सर्वाधिक 1640 लसीकरण झाले असून त्या खालोखाल शाहूनगर रुग्णालयात तब्बल 1300 लसी देण्यात आल्या आहे. महापौर यांच्या पाठपुराव्याने 6062 लस्सी जळगाव शहरातील नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत नागरिकांनी या लसीकरणाचा फायदा घेण्याचे आवाहन महापौरांतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here