जळगावात समिधा प्रतिष्ठान आयोजित समिधा व्यख्यानामाला संपन्न

0
15

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव-लोकनेते पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त समिधा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा दिव्या यशवंत भोसले यांनी ऑनलाईन पाच दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन केले होते.

दि १४ डिसेंबर ते १८ डिसेंबर २०२१ ला संपन्न झालेल्या व्याख्यानमालेचे उदघाटन सकाळ समूहाचे मुख्य संपादक संदीप काळे यांच्या हस्ते करण्यात आले, तर गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री हेमंत पाटील यांनी व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफले. जिजाऊ, सावित्री ते आजची स्त्री : प्रगती ते अधोगती या विषयावर बोलतांना स्त्रीला अजूनही स्वतःच्या हक्क मागणीसाठी झगडावं लागत हे दुःख असल्याचे सांगत. स्वराज्यात शिक्यावर स्त्री ला मान होता. आज स्त्रीला आर्थिक सक्षमता हवी आहे, आर्थिक स्वातंत्र्य हवे आहे, समाजात घरात माणूस म्हणून जगता येण्यासाठी आता स्त्रीने आधी तशी सुरुवात स्वतःपासून करावी लागेल असे मत राजश्री पाटील यांनी व्यक्त केले.

दिनांक १४ डिसेंबर 2021 रोजी दुसऱ्या पुष्पात रेणुका कड सामाजिक कार्यकर्त्या यांनी स्त्रीमुक्तीच्या चळवळीची गरज का यावर आपल्या मनोगतात सतरावे शतक हे खऱ्या अर्थाने स्त्री मुक्ती चळवळीचे शतक होते. या शतकात स्त्रियांचे राजकीय हक्क, त्यांच्यावर धर्माचा सत्तेचा दबाव,अंधश्रद्धेचा पगडा याविषयी चळवळी व जागरूकता झाली.आज एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे स्त्री पूरक समता वादी मूल्यांची देवाण घेवाण झाली पाहिजे. आज खऱ्या अर्थाने स्त्री साठी स्त्री मुक्तीची चळवळ झाली पाहिजे.सखोल अभ्यास करून स्त्री मानवतेची समतावादी मूल्ये समाजात रुजवणे गरजेचे आहे. मागील काळात झालेल्या आंदोलनात महिला शेतकऱ्यांनी केलेली आंदोलने विशेष प्रभावी ठरली त्यात महिलांनी घेतलेला सहभाग विशेष ठरला त्या सहभागाकडे वेगळ्या दृष्टीने बघून समतेची मूल्य पेरणे आज गरजेचे आहे.आज वातावरणीय बदलाचा परिणाम स्त्री,बालक, वृद्ध यांवर होत असून त्यासाठी वसुंधरा वाचवा सारख्या पर्यावरणीय भूमिका स्त्रीया घेत असून त्यात त्यांचा विशेष सहभाग असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्या रेणुका कड यांनी व्यक्त केले.तिसऱ्या पुष्पात ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांनी आपल्या भाषणात सामाजिक परीवर्तनासाठी लिहायचं असेल तर भाष्य कविता लिहायला हवी.मी समाज परिवर्तनाच्या हेतून भाष्य कविता लिहू लागतो,वात्रटिका लिहिल्या. मराठी साहित्य लिहिणाऱ्यांची मुलें इंग्रजी माध्यमात शिकत असतील तर त्यांना मराठी माती महाराष्ट्र कसा कळणार.
आजी नाचू लागली,आजोबा नाचू लागले
शेंबडे नातवंडे इंग्रजी वाचू लागले
नातू नाच लागली,नात नाचू लागली
घरी इंग्रजीची रद्दी साचू लागली
अजाण मुळाखाली माती ,
खचू
इंद्रायणीच्या डोहाला पोथी टोचू लागली
अशा सामाजिक भूमिका दर्शवणारी कविता सादर करत दोन पिढ्या त्यांच्या मधील मराठी इंग्रजी संस्कृती यांचे दर्शन घडवताना,
साहित्यिकांच्या सामाजिक जाणिवेवर समाज परिवर्तन होऊ शकते .केशवसुत कुसुमाग्रज,पुल देशपांडे सारखी परिवर्तनशील लिहीणार्या साहित्यिकांची परंपरा असलेले आपण,आपल्या या भूमीत सत्तरच्या दक्षकांपर्यंत साहित्यिकांचे राज्य होते.दिवाळी आली की दिवाळी अंक घेण्यास लोक धडपडायचे,या दिवाळी अंकाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन झाले.हल्ली साहित्यिकांची निष्क्रियता जाणवते पण ग्रामीण भागातून आलेले साहित्यिक साहित्य जिवंत ठेवत असून आचार्य अत्रे म्हणायचे त्याप्रमाणे इथल्या शेतकरी कामगारांना कळेल अशा भाषेत लिहायचं असे मत व्यक्त केले.

चौथ्या सत्रात उपप्राचार्य प्रा.डॉ.सविता गिरे पाटील यांनी आपले पुष्प गुंफले.स्त्री ही समाजाला दिशा देऊ शकते.प्रत्येक मुलीने शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर खंबिरपणे उभं राहणं गरजेचे आहे.तसेच आपण सर्वांनी निर्धार केला की आपल्या कुटूंबातील नव्हे तर आपल्या गावातील परिसरातील मुलींना देखील आपण शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.मुलीचं शिक्षणाच प्रमाण वाढवण्या साठी तिच्या पालकांच समुपदेशन करणं गरजेचं आहे असे मत व्यक्त केले. पाचव्या सत्राचे पुष्प मिरर Now चे संपादक मंदार फणसे यांनी माध्यमांवरील विश्वासार्हता का कमी होते यावर गुंफले.पत्रकारिता ही एक सामाजिक जबाबदारी आहे.आताची माध्यम आहेत ती नेरेटिव्ह आहेत ती न्यूज पेक्षा जास्त नेरेटिव्ह जास्त करता त्यामुळे त्यातून जर आपण बाहेर आलो तो येत्या काळात आपण विश्वासाहर्ता कमावू शकतो.जर आपल्याला नेरेटिव्ह कमी करायचा असेल तर एक वैचारिक बैठक प्रत्येकाची असायला हवी आणि त्यात बैठक ही संविधानाचीन असेल तर जास्त व्यापक आणि समग्र असू शकते. आपण संविधानीक दृष्टीने एकमेकांकडे बघू लागलो आणि त्या जाणिवेतून स्वीकारू लागलो तर त्यातून आपण विश्वासहर्ता कमवू शकतो असे मत मंदार फणसे यांनी व्यक्त केले.
तसेच या व्याख्यानमालेत या पाच व्याख्यात्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रभर स्त्रीयांसाठी मासिक पाळी व इतर स्त्री विषयक आजारांसाठीची वैद्यकीय शिबिरे व समुपदेशन केंद्र उभारणे, ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून 2 अंगणवाडी डिजिटल करणे, ग्रामीण भागातील नागरिकांना वाचनाची गोडी लागावी आणि पुस्तकांचा समृद्ध वारसा त्यांच्यापर्यंत पोचावा म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक गाव 500पुस्तके हा उपक्रम राबवून फिरते वाचनालय स्थापन करणे,महाराष्ट्रातून 81 आदिवासी मुले दत्तक घेऊन शैक्षणिक जबाबदारी स्वीकारणे, समिधा प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयात तरुणांसाठी मानसिक समुपदेशन केंद्र सुरू करणे हे अनुक्रमे पाच संकल्प करण्यात आले. ही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोमल पाटील,विद्या कोळी, धनश्री माळी, योगेश चौधरी,रोहन महाजन, तेजस पाटील, शुभम गिते, श्रेयस चौधरी यांनी मेहनत घेतली.

समिधा व्याखानमालेचे आयोजन आणि सूत्रसंचालन समिधा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा दिव्या यशवंत भोसले यांनी केले असून,गेल्या तीन वर्षांपासून समिधा प्रतिष्ठान लोकोपयोगी कार्यात अग्रेसर असून सांस्कृतिक,साहित्य ,शैक्षणिक,पर्यावरण,आरोग्य,शिक्षण अशा विविध स्तरावर शाश्ववत काम करत असून,समाजातील युवक व महिलांना रोजगार देऊन सक्षम करण्याचे प्रमुख उद्दिष्ट प्रतिष्ठानने अंगिकारले आहे.प्रतिष्ठानच्या अशा सामाजिक प्रबोधनात्मक कार्याचे राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले असून या व्याख्यानमालेच्या निमित्ताने सुरू झालेला हा सामजिक कार्याचा यज्ञ आता असाच जनतेसाठी धगधगता कार्यरत ठेवण्याचा निर्धार अध्यक्षा दिव्या भोसले व संपूर्ण समिधा प्रतिष्ठानच्या टीमने केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here