चौपदरीकरणाच्या कामाच्या दर्जावर उभे राहिले प्रश्नचिन्ह

0
1

भुसावळ : प्रतिनिधी

राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर साकेगाव नजीक सर्व्हिस रोडवरील एका पुलास चक्क भगदाड पडल्याने या भगदाडातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. दरम्यान, ही पाण्याची गळती साकेगाव ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा वाहिनीस क्षती पोहचल्याने पुलास भगदाड पाडत मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरु झाली आहे. या प्रकरणाने चौपदरीकरणाच्या कामास 19 महिने झाले असतांनाच हा प्रकार झाल्याने संबंधित कंपनीने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
याबाबत माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या साकेगाव गावालगत एका नाल्यावर पुल बांधण्यात आलेला आहे. या नाल्याच्यालगत दक्षिणेकडे असलेल्या साकेगाव ग्रामपंचायतीच्या वहिरीतून गावास पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी गेली आहे. या जलवाहिनीच्या वरतून चौपदरीकरण करणाऱ्या कंपनीने एका पुलाची उभारणी केली आहे. मात्र या कामादरम्यान दिरंगाई झाल्याचे दिसून आले आहे. ही पाईपलाईन बऱ्याच दिवसापासून पुलाच्या मध्येच फुटली आहे. सदर पाणी गळतीकडे ग्रामपंचायतीनेही दुर्लक्ष केल्याने पाणी गळतीस मोठे स्वरुप प्राप्त झालेे. त्यामुळे या पाणी गळतीकडे पुलावरील भागास भगदाड पडले. यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. तसेच सदर काम करतांना पाईपलाईनबाबत योग्य ती काळजी घेण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देवून सदर प्रकरणी कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. दरम्यान, पाणी गळतीचा वेळ हा संध्याकाळी 7 ते 10 वाजेच्या दरम्यान, मोठ्या प्रमाणात असतो. सुदैवाने आतापर्यंत या खड्ड्यांत अपघात झाला नाही. मात्र या खड्ड्यामुळे जर अपघात झाला तर मोठ्या संख्येने हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित कंत्राटदारांनी हे काम लवकरात लवकर करून होणारी हानी टाळावी अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, साकेगाव येथे मुबलक पाणी साठा असतांनाही याप्रकारे पाणी गळतीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. मात्र नागरिकांना ग्रामपंचायत प्रशासन दोन दिवसा आड पाणी देते. या ग्रामपंचातीचा भोंगळ कारभार व हलगर्जीपणाबाबत ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here