चोरी गेलेले मोबाईल 44 तक्रारदारांना केले परत

0
2

जळगावः प्रतिनिधी
शहरातील विविध पोलिस स्थानकातंर्गत गेल्या सहा महिन्यापासून मोबाईल चोरीच्या तक्रारीत वाढ झाली होती. त्या अनुशंगाने शहरातील विविध पोलिस स्थानकांमध्ये तक्रारी दाखल केलेल्या होत्या. सदर तक्रारींची दखल घेत पोलीसांनी मोबाईल डिटेक्ट करत ४४ तक्रारदार मुळ मालकांना मोबाईल परत मिळवून दिले आहे . सदर कार्यक्रम पोलीस कवायत मैदानातील मंगलम सभागृहात जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.प्रविण मुंडे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.प्रविण मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, गेल्या सहा महिन्यापासून शहरातील विविध ठिकाणी मोबाईल चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी या चोरीच्या घटनेचा तपास करून ४४ तक्रारदारांना त्यांचे मोबाईल आज सकाळी परत करण्यात आले. या मोबाईलची किमंत साधारण 8 ते 10 लाखांच्या आसपास असल्याचेही श्री . मुंडे यांनी सांगितले. याबद्दल जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.प्रविण मुंडे यांनी जिल्हा गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक केले आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या मोबाईलसह किंमती वस्तू चोरीस गेली तर आपल्या जवळच्या पोलिस स्थानकात तक्रार द्यावी, जेणेकरून मोबाईल ट्रेकींगवर ठेवून त्या मोबाईलचा तपास पोलिसांमार्फत करण्यात येईल. तसेच पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहनही पोलिस अधिक्षक डॉ.प्रविण मुंडे यांनी यावेळी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here