‘ग.स.सोसायटी’च्या अध्यक्षांची निवड उद्या

0
2

जळगाव ः प्रतिनिधी
ग. स. सोसायटीच्या अध्यक्षपदाची निवडणूक उद्या 12 मे रोजी होत आहे. यानिमित्ताने सोसायटीतील राजकीय घडामोडी गतिमान झाल्या आहेत. त्रिशंकू स्थिती असलेल्या ग.स. मध्ये संचालक पळवापळवीची शक्यता लक्षात घेता दोन गटांनी आपले संचालक सहलीला रवाना केले आहेत.दिवसभरच्या बैठकांमुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रंगत येण्याची शक्यता आहे.

जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीची पंचवार्षिक निवडणूक गेल्या आठवड्यात झाली. 21 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत एकाही गटाला बहुमत मिळालेले नाही. सहकार गटाचे 9, प्रगती व लोकसहकार गटाला प्रत्येकी 6 जागांवर विजय मिळाला आहे. बहुमतासाठी 11 संचालकांचा आकडा गाठणे गरजेचे आहे. बहुमताच्या जवळ असलेल्या सहकार गटाकडून इतर दोन गटांमधील संचालकांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली.लोकसहकार व प्रगती गटाकडून युतीचे संकेत दिले जात आहेत. दरम्यान, निवडणूक एक दिवसावर असताना कोणत्याही गटाकडे बहुमत नसल्याचे चित्र काल उशिरापर्यंत दिसत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here