विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी
स्वच्छ इंधन बेहतर जीवन असा नारा देऊन केंद्र सरकारने १ मे २०१६ रोजी संपूर्ण भारतात प्रधानमंत्री उज्वला योजनेचा शुभारंभ केला या योजनेचा उद्देश भारतातील दारिद्र्य रेषेखालील सुमारे पाच कोटी महिलांना मोफत घरगुती एलपीजी गॅस देण्याचा होता जगण्यासाठी अन्न लागते आणि अन्न शिजवण्यासाठी इंधन लागते सुरुवातीला घरोघरी पोहोचवण्यात सरकार यशस्वी झाले पण आज कोण गरिबांच्या घरामध्ये एका कोपऱ्यात गॅस पडून आहे एवढ्या महागाईत महागडा गॅस भरण्यासाठी एवढी रक्कम आणायची कुठून असा प्रश्न महिलांना पडला आहे .ग्रामीण भागामध्ये पुन्हा एकदा घरातून धूर निघताना दिसत आहे, चूल पेटवण्यासाठी उज्वला शेतामध्ये लाकडे आणण्यासाठी फिरत असताना दिसत आहे एक तर अनेक दिवसापासून चुलीची असलेली सवय मोडली त्यामुळे पुन्हा चुलीवर स्वयंपाक करणे अनेक महिलांना अवघड जात आहे.
भारताला धूर मुक्त करण्याच्या उद्देशाने सुरू केलेले उज्वला योजना ही महिलांची एक प्रकारची अवहेलना करणारी योजना असल्याचे मत सोयगाव तालुक्यातील अनेक नागरिकांनी यावेळी व्यक्त केली सुरुवातीला सदर योजनेत उज्ज्वला यांना एलपीजी सिलेंडर वर ५०% सबसिडी देऊन एक प्रकारची केंद्र शासनाकडून दिशाभूल करत आज रोजी सदर एलपीजी सिलेंडर ३० रुपये सबसिडी केंद्र शासनाकडून उज्वला यांना देऊन त्यांच्या गरीबीची थट्टा करत असल्याचे चित्र आहे असे मत सुद्धा सामान्य जनतेकडून व्यक्त करण्यात येत आहे