गोपीचंद पुना पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा…!!!

0
3
कोळगाव ता-भडगाव(वार्ताहर)– कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षण संस्था,भडगाव, संचलीत, गोपीचंद पुना पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव येथे ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात कोरोना नियमांचे पालन करीत मान्यवर व शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनींच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
  कार्यक्रमात ध्वजारोहण स्थानिक स्कूल कमिटी सदस्य श्रीयुत संभाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून युवराज पाटील,संजय पाटील,प्रवीण पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
   आजच्या ह्या कार्यक्रमात
  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस.ए.वाघ व आबासाहेब कोळगावकरांनी केले.
  कार्यक्रम यशस्वी होणेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली न्यू इंग्लिश मेडियम स्कुल,माध्यमिक विद्यालय,कनिष्ठ महाविद्यालय तसेच कला व विज्ञान महाविद्यालयाच्या शिक्षक-शिक्षिका,प्राध्यापक-प्राध्यापिका,शिक्षकेतर कर्मचारी बंधु-भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here