जळगाव : प्रतिनिधी
शहरातील केळकर मार्केट परिसरातील कापड दुकानांना शार्टसर्कीटमुळे मोठ्या प्रमाणावर आग लागल्याची घटना रात्री घडली आहे. याआगीत किमान लाखो रूपयांचे कापड जळून खाक झाले आहे. याठिकाणी अग्निशमन बंबाच्या पथकाकडून आग विझविण्याचे काम सुरू होते.
जळगाव शहर पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गणेश मार्केट मधील कापड दुकानांना शुक्रवारी ११ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास शार्टसर्कीटमुळे अचानक आग लागली. यात मार्केटमधील राजेश मोतीरामानी व गिरीश मोतीरामानी यांचे सारीका साडीया, सारीका टॉप, सारीका टेक्सटाईल दुकानात कापड, साडी व लेडीज ड्रेस यांना मोठ्या प्रमाणावर आग लागली. यावेळी महापालिकेचे अग्निशमन विभागाचे तीन बंबांनी घटनास्थळी धाव घेतली असून आग विझविण्याचे काम सुरू आहे.