सोयगाव : विजय चौधरी
आगामी जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने सोयगाव तालुक्यात गट,गणाच्या आरक्षणा सोबतच सोयगाव पंचायत समितीच्या सभापती पदाच्या आरक्षणावरही राजकीय चर्चांना उधाण आल्याने इच्छुकांचा आतापासूनच पंचायत समितीच्या सभापती पदाच्या आरक्षणावर डोळा लागून आहे.
सोयगाव तालुक्यात जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पूर्वतयारीला प्रशासन जुंपले असून गट आणि गणांच्या आरक्षणाची लगीनघाई जवळ येवून ठेपली आहे.त्यासाठी राजकीय इच्चुकानंना मात्र आरक्षण आपलेच राहणार असल्याची जवळपास शाश्वती आल्याने आता सभापती पदाच्या आरक्षणावर इच्छुकांचा डोळा लागून आहे.त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले असून सभापती पदाच्या मागील आरक्षणावरून आगामी आरक्षणावर चर्चेला वेग आला आहे.
गट,गण जैसे थे असतांनाच इच्च्कांनी मात्र तयारी हाती घेतली असून गट आणि गणाच्या प्रभाग रचना जाहीर होताच आरक्षण आणि निवडणुकीचा कार्यक्रम लागू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.त्यामुळे राजकीय पक्षांनी तयारी हाती घेतली आहे.राजकीय पक्षांच्या वतीने उमेदवारांच्या चाचपणी साठीची पहिली फेरी झालेली आहे मात्र गटासाठी सर्वच जातीच्या प्रवर्गाच्या उमेदवारांची चाचपणी राजकीय पक्षांनी केली असल्याने आरक्षण जाहीर होताच राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर होतील असा अंदाज आहे.आरक्षणा आधीच राजकीय पक्षांनी गट आणि गण निहाय सर्वच प्रवर्गातील इच्छुकांची चाचपणी केलेली आहे,त्यासोबतच तयारीला लागा असे निर्देशही इच्छुकांना राजकीय पक्षांनी दिले आहे त्यामुळे राजकीय पक्षांची पूर्वतयारी जवळपास पूर्णच असल्याचे राजकीय मैदानातील चित्र आहे.
सोयगाव तालुक्यात इच्छुकांची भाऊगर्दी
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी सोयगाव तालुक्यात इच्छुकांची भाऊ गर्दी वाढली आहे यामध्ये मातब्बरासोबतच नवखेही गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्याने या भाऊ गर्दीवर नियंत्रण मिळविणे राजकीय पक्षांना कठीण झाले आहे.