कै. बाबूरावजी काळे स्कूल येथे जागतिक महिला दिन साजरा.(व्हीडिओ )

0
2

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी

कै.बाबुरावजी काळे स्कूल, सोयगांव येथे आज जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या पातळीवर शालेय विद्यार्थिंनींनी कार्यक्रम आयोजित केला यामध्ये विद्यार्थीनींनी शिक्षेकेचे पुष्पगुच्छ देऊन त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या त्यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपापली मनोगत या ठिकाणी व्यक्त केली. त्याच प्रमाणे ज्ञानज्योती शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश यादव सर व प्राध्यापक डॉ. डि.आर.पवार सर यांनी महिलांच्या कर्तुत्वावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे शिक्षक ज्ञानेश्वर एलीस, शितल काटोले, मनिषा पाटील, अंजली कथलकर, शितल पवार, विद्या पाटील, आशा पंडित, पुजा सोनुने, पुजा इंगळे, मुश्ताक शहा, संजय डापके, आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता पाटील यांनी केले तर आभार प्राची पाटील हिने मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here