कै.धनराज बिरारी यांच्या कुटूंबियांना न्याय मिळावा

0
2

जळगाव ः प्रतिनिधी
जिल्हा दुध संघात कंत्राटी कामगार म्हणून कर्तव्यावर असतांना धनराज बिरारी यांचे मुक्ताईनगर येथे झालेल्या अपघातात निधन झाले होते. त्यांच्या कुटूंबियांना योग्यतो न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्र सुवर्णकार सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, कै.धनराज सुरेश बिरारी यांची आर्थिक परिस्थिती अंत्यत गरीबीची असून त्यांच्या पश्चात गरोदर पत्नी व दोन लहान मुली वृध्द आई असल्याने घरात कर्ता पुरुष नसल्याने त्यांच्या पत्नीस दुध फेडरेशन येथे कायमस्वरुपी नोकरी मिळावी.

धनराज बिरारी यांची ड्युटी संपल्यानंतरही एमडीने त्यांना दुध संघाचा काहीही संबंध नसणाऱ्या नांदुरुस्त ट्रॅकरचे दुध दुसऱ्या टँकरमध्ये ट्रॉन्सफर करण्यासाठी पाठविले. व त्याठिकाणी त्यांचा अपघाती मृत्यू झाला. धनराज बिरारी यांचा या कामाशी संबंध नसतांनाही त्यांना त्याठिकाणी कामासाठी पाठविले. म्हणून त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेले दुध संघाचे एमडी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच बिरारी यांच्या कुटूंबियांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी, याच बरोबर दुध फेडरेशनच्या गेटवर मदतीची मागणी करायला गेलेले मयताच्या कुटूंबियांसह कामगारांवर कारण नसतांना अमानुषपणे लाठीमार करण्यात आला. याबाबत सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी असे म्हटले आहे.
निवेदनावर महाराष्ट्र सुवर्णकार सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विसपुते, तसेच अहिर सुवर्णकार समाज महिला मंडळाचे रंजना वानखेडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here