केशवस्मृती प्रतिष्ठानचा उपक्रम ः एनजीओ क्लिनिक सुरू

0
3

जळगाव ः प्रतिनिधी
आपापल्या कार्यक्षेत्रात सामाजिक संस्था काम करीत असताना अनेक तांत्रिक अडचणी, व्यवस्थापन, पैसा उभारणे, शासकीय रिपोर्ट वेळेवर तयार करणे असे प्रश्न भेडसावतात. अपूर्ण माहितीअभावी अशा संस्था अडचणीत येऊन वेळप्रसंगी बंद पडतात, अशा आजारी संस्थांना योग्य वेळेवर उपचार मिळण्यासाठी सुरु केलेला एनजीओ क्लिनिक हा स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी केले.

केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वर्धापनदिनी क्लिनिकचा उद्घाटन सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष भरतदादा अमळकर, समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील, मुंबई येथील झिरो डव्हायझर संस्थेचे जयंत फलके व सचिव रत्नाकर पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन भानुदास येवलेकर यांनी केले. यशस्वीतेसाठी सागर येवले, रोहन सोनगडा, किशोर गवळी, गोपाळ तगडपल्लेवार यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here