केवळ 30 दिवसांत 10 किलो वजन कमी करा

0
7

मुंबई : प्रतिनिधी
बदलती जीवनपध्दती, व्यायामाचा अभाव (Lack Of Exercise), चुकीचा आहार, फास्टफूडचा अतिरेक आदी विविध कारणांमुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होत असते. वाढत्या वजनामुळे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्रदयविकार (Heart disease) आदी अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे वजन नियंत्रीत असणे आवश्‍यक असते. परंतु वजन नेमके कसे नियंत्रित करावे, यासाठी किती कालावधी द्यावा असे अनेक प्रश्‍न निर्माण होत असतात. जर तुम्हाला फक्त 30 दिवसात 10 किलो वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला तुमची जीवनशैली (Lifestyle) बदलावी लागेल. कारण आहारात बदल केल्याशिवाय तुम्ही हे ध्येय पूर्ण करू शकत नाही. प्रत्येकाला वजन कमी करायचं असतं, असे बरेच लोक आहेत ज्यांना महिनाभरात पाच ते दहा किलो वजन कमी करायचे आहे. मात्र, अनेक प्रयत्न करूनही हे लक्ष्य पूर्ण करू शकत नाहीत. जर तुम्ही देखील अशा लोकांमध्ये असाल तर या लेखात 30 दिवसात 10 किलो वजन कसे कमी करू शकता याच्या काही टीप्स देणार आहोत.
जीवनशैलीतील बदल आवश्‍यक
वजन कमी करण्यासाठी तुम्हाला तुमची जीवनशैली बदलावी लागेल. कारण जीवनशैलीत बदल करून आहारात बदल केला तर वजन सहज कमी करता येते. वजन कमी करण्यासाठी काही नियमावली आहे. आपण रोज कोणता आहार घेतो, किती खातो यावर आपले वजन अवलंबून असते. त्यामुळे याकडे लक्ष देणे क्रमप्राप्त ठरते.
अनेक तज्ज्ञ असे म्हणतात, की दररोज एक कप कोमट पाणी प्यायल्यास वजन कमी होऊ शकते. महिनाभर हे फॉलो केल्यास तुमचे दोन किलो वजन सहज कमी होऊ शकते.
साखरेचे सेवन कमी करण्याचा प्रयत्न करा, लठ्ठपणा वाढण्याचे मुख्य कारण साखर आहे. अनेक जणांचा साखर मोठ्या प्रमाणात आवडत असते. परंतु ती पचवायला पुरेसे श्रम होत नसल्याने परिणामी रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत जाते. यातून लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्रदयविकार आधी धोका वाढू लागतो. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित करणे आवश्‍यक असते.
असे मानले जाते, की आठवड्यातून एकदा उपवास करावा. अनेक संशोधनांमध्ये असे सांगितले गेले आहे, की उपवासामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो. त्यामुळे लठ्ठपणासोबतच रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलही कमी होते.
अनेकांना सकाळी लवकर उठून व्यायाम करण्याचा कंटाळा असतो. परंतु याचे दुष्परिणाम तुमच्या आरोग्यावर जाणवू शकतात. रोज किमान अर्धा तास व्यायाम आवश्‍यक आहे.
आपल्या आहारात जास्तीत जास्त फायबरयुक्त घटकांचा समावेश केल्यास पचनक्रिया सुधारते. अनेकदा आपण खाल्लेलं अन्न पचत नाही. त्यामुळे अनेक शारीरिक समस्या निर्माण होत असतात. फायबरमुळे पचन सुधारत असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here