जळगाव, प्रतिनिधी । येथील प्रसिद्ध सुवर्ण व्यापारी किशोर बाविस्कर (दापोरेकर) यांची मुलगी स्वाती किशोर बाविस्कर यांची केंद्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्लीच्या जिल्हासह सरचिटणीसपदी नियुक्ती झाली असून सदर नियुक्ती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण मिश्र यांनी केली आहे.
स्वाती बाविस्कर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्याची नियुक्ती करण्यात येत असल्याचे मिश्र यांनी सांगितले. त्यांच्या या निवडी बद्दल त्यांच्यावर समाजाच्या सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे