कुठेतरी फुंकर मारतात आणि वादळ आल्याचे वाटते

0
1

मुंबई : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरले आहे. तत्पूर्वी शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपावर खोचक शब्दांत टीका केली. कुठेतरी फुंकर मारतात आणि त्यांना वाटतं वादळ आलं, अशा शब्दांत संजय राऊतांनी निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर देखील टीका केली.
यंदाचे अधिवेशन वादळी होणार का? असा प्रश्‍न विचारताच संजय राऊत म्हणाले, विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरेल अशी हूल विरोधी पक्षातर्फे उठवली जाते आहे. आदळ आपट करून वादळी अधिवेशन होत नाही. त्यामुळे कसले वादळ निर्माण करणारे कुठेतरी फुंकर मारता त्यांना वाटत वादळ आले अशी वादळ येत नाही. आदळआपट करून काही प्रश्‍न सुटणार नाही. ठाकरे सरकारला साधा चरोटाही उठणार नाही. काल मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रीमंडळ, आमदार, प्रमुख नेते हे छगन भुजबळांच्या निवासस्थानी जमले होते. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, आमची 170 ची ताकद कायम आहे. त्यामुळे कसलं वादळ निर्माण करणार तुम्ही?
राऊत म्हणाले, ‘वादळ अडीच वर्षांपूर्वी आले त्यांच्यामुळे सगळे झोपले ते अजून उठले नाहीत. विरोधकांनी प्रश्‍न विचारावे आपण संसदीय लोकशाही मानतो दिल्लीतील राज्यसभेत संसदीय लोकशाहीला किंमत नसेल महाराष्ट्रातील विधानसभेला मोठी परंपरा आहे त्यानुसार विरोधी पक्षाने काम करावे. राज्यातील मुख्यमंत्री हे राजकीय सामाजिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेताय भविष्यात ते महाराष्ट्रभर फिरतील महाविकास आघाडी भक्कम करतील.
काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्याठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. तेव्हा माध्यमांनी चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी प्रश्‍न विचारला. तेव्हा फडणवीसांनी पत्रकारांना ‘माझी पत्रकार परिषद आहे, त्यांना प्रश्‍न विचारु नका,’ असे सांगितले. यावर बोलताना राऊत म्हणाले. ‘चंद्रकांत पाटील हे कायमच याला कोण विचारतय? त्याला काय किंमत आहे? असे बोलतात. प्रदेशाध्यक्ष असून त्यांना काय किंमत आहे ते ओळखले पाहिजे. मला त्यांची कीव येते,’ असा टोला राऊतांना चंद्रकांतदादांना लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here